कासार सिरसीहून कर्नाटकात जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:13+5:302021-08-24T04:24:13+5:30
कासार सिरसी : कासार सिरसीहून कर्नाटकात जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कासार ...

कासार सिरसीहून कर्नाटकात जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था
कासार सिरसी : कासार सिरसीहून कर्नाटकात जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कासार सिरसीहून कर्नाटकात कासार सिरसीवाडी व कोराळी या मार्गे जाणाऱ्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, याकडे होत असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कासार शिरशी हे शहर राज्याच्या सीमेवरची मोठी बाजारपेठ असून, येथील बाजारपेठ या भागातील अनेक गावांवर अवलंबून आहे. राज्याच्या सीमा भागात कर्नाटकात जाणाऱ्या कोराळवाडी व शिरशीवाडी या दोन बेरड वस्तीत जाणाऱ्या प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली आहे. या मार्गांवरून नागरिकांना व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. हे रस्ते दुरूस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.