ग्रामीण भागातील राजकारण तापले,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:18+5:302020-12-30T04:26:18+5:30

सलीम सय्यद / अहमदपूर : तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. ...

Politics in rural areas is hot, | ग्रामीण भागातील राजकारण तापले,

ग्रामीण भागातील राजकारण तापले,

सलीम सय्यद / अहमदपूर : तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष, आजी - माजी सरंपच आणि ग्रामपंचायतींचे भावी सदस्य, सरपंचांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता कार्यकर्त्यांचीही धावपळ वाढली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी तरुण माेठ्या प्रमाणावर उडी घेत आहेत. गाव पातळीवरील निवडणुकीत तरुणांचा चांगलाच सहभाग वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातून अनेकांची एकाधिकारशाही आता संपुष्टात येणार आहे.

अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक नेत्यांनी गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप नागरिकांतून केला जात आहे. याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसणार आहे. निवडणूक आणि मतदानाबाबत आता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. निवडणुका लागल्यानंतर कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. निवडणुकीत हाेणारा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. सध्या ग्रामीण भागात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

अहमदपूर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक हाेत आहे. गुलाबी थंडीत गावा-गावातील राजकारण आता तापू लागले आहे. पॅनलच्या उभारणीसह उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत.

या गावात हाेणार ग्रामपंचायत निवडणुका...

हाडोळती, उजना, माळेगांव (खु.), मोघा, टेंभुर्णी, गुगदळ, हगदळ, परचंडा, नागझरी, सलगरा, मुळकी, लिंगदाळ, तेलगांव, सावरगांव (थोट), किनीकदू, धानोरा (खुर्द ), खरबवाडी, गादेवाडी, उमरगा यल्लादेवी, गुट्टेवाडी, नरवटवाडी, येलदरवाडी, हंगरगा, ढाळेगांव, शेनकुड, मोहगाव, खानापूर (मो), ब्रम्हपुरी, आनंदवाडी, चिलखा, सोरा, आंबेगाव, बोडका, तळेगांव, कौडगांव, हिप्परगा कोपदेव, बेलूर, हासरणी, कोकणगा, चिखली, केंद्रेवाडी, मोळवण, हिंगणगाव, खंडाळी, वंजारवाडी, धानोरा (बु.), माकणी, गोताळा, सुनेगांव शेंद्री.

राजकीय हालचालींना आला वेग...

गावोगावी पॅनल निर्मिती आणि उमेदवार शोधण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे उमेदवार शोधण्यासाठी गावागावात बैठकांना अधिक वेग आला आहे. डाव - प्रतिडाव, भाऊबंदकी व गटबाजीचे राजकारण गतिमान झाले आहे. गावागावात आरक्षणनुसार प्रभागातील उमेदवारांची निवड केली जात आहे.

Web Title: Politics in rural areas is hot,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.