पोलीस यंत्रणांनी सक्ती करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:26+5:302021-04-07T04:20:26+5:30
शहरामधून प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे यंत्रणांनी सजग राहावे. ग्रामीण भागाच्या तुलनेत लातूर शहरात रुग्ण वाढताना दिसत आहेत. प्रादुर्भाव नियंत्रणात ...

पोलीस यंत्रणांनी सक्ती करू नये
शहरामधून प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे यंत्रणांनी सजग राहावे. ग्रामीण भागाच्या तुलनेत लातूर शहरात रुग्ण वाढताना दिसत आहेत. प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी वेगळे नियोजन करून अंमलबजावणीवर जास्तीचे लक्ष देण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. एकदा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील रुग्ण शोधण्याची मोहीम राबवावी. ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. मृत्यूदर कमी राहील, याची काळजी घ्यावी. वेळेत चांगले उपचार मिळाल्यानंतर रुग्णांचा मृत्यूदर कमी राहतो, हा अनुभव लक्षात घेता आरोग्य यंत्रणांनी जास्तीत जास्त टेस्ट करून रुग्ण लवकरात लवकर उपचारासाठी येईल, याचे नियोजन करावे.
रेमडेसिवीरची कमतरता भासणार नाही
रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा लातूर जिल्ह्यासाठी उपलब्ध व्हावा, या दृष्टीने संबंधित कंपनी व प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. याऊपरही अडचणी येत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याशी संपर्क करावा. ते सहकार्य करतील, असेही पालकमंत्र्यांनी सूचित केले. निर्धारित दरापेक्षा अधिकच्या दराने या औषधाची विक्री होणार नाही, याकडेही लक्ष ठेवावे.