शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरमध्ये पोलिसांनी एका चोराकडून जप्त केल्या १८ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:20 IST

चोरट्याने उदगीर शहर, लातूर, रेल्वे स्टेशन, कमालनगर आदी ठिकाणहुन दुचाकी चोरल्याचे कबुल केले.

उदगीर (जि़ लातूर) : चोरीस गेलेल्या एका बाईकच्या तपासादरम्यान उदगीर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. अधिक माहिती चौकशी केली असता त्याच्याजवळ चोरीच्या १८ दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले़ या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत़

उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथील रत्नेश्वर गोगे यांची दुचाकी २२ नोहेंबर २०१८ रोजी चोरीस गेली होती. दरम्यान, शहरात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवर्धने भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करण्यात आले़ या पथकाने गोेगे यांच्या दुचाकीचा तपास सुरु केला असता हुसेन नागनाथ कांबळे (रा. गंगापूर, ता.उदगीर, हमु़ उदगीर) याने लातूरनजीकच्या बाभळगाव रोडवरील एका पेट्रोल पंपावरील काम करणा-यास दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती पथकास मिळाली़ त्यावरुन पथकाने तिथे जाऊन मोटरसायकल ताब्यात घेतली

दरम्यान, हुसेन कांबळे यांचा शोध घेऊन ९ जानेवारी रोजी त्यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उदगीर शहर, लातूर, रेल्वे स्टेशन, कमालनगर आदी ठिकाणहुन दुचाकी चोरल्याचे कबुल केले. चोरीच्या दुचाकींचे नंबर प्लेट बदलून सय्यदपूर, स्वत:चे गाव गंगापूर, भाकसखेडा आदी भागात विक्री करीत असल्याचे सांगितले़ त्याच्या सांगण्यावरून  पोलिसांनी एकूण १८ मोटरसायकली जप्त केल्या आहेत़ 

ही मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवर्धने भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येऊन पथकात पोहे़ सुधाकर केंद्रे, विलास फुलारी, बाळू आगलावे, श्रीहरी डावरगावे, कृष्णा चामे, महेश खेळगे यांचा समावेश होता़ ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस गेल्या असतील त्यांनी आपल्या दुचाकीची मुळ कागदपत्रे उदगीर शहर पोलीस ठाण्यात आणून जप्त करण्यात आलेल्या दुचाकीची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे यांनी केले आहे.

टॅग्स :theftचोरीbikeबाईकPoliceपोलिस