विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST2021-04-28T04:21:26+5:302021-04-28T04:21:26+5:30
उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक नियम ...

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून तंबी
उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक नियम लागू केले आहेत. त्याची प्रभावीपणे हाळी व हंडरगुळीत अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही गावांतील लोकप्रतिनिधी दिसून येत नाहीत.
या दोन्ही गावांत सकाळच्या वेळी काही जण रस्त्यावर बिनधास्त फिरतात. काहींच्या चेहऱ्यास मास्कही नसतो. काही जण कोरोना नियमांची पायमल्ली करतात. सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू असल्याने नागरिक गर्दी करतात. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद असली तरी गावातील काही किराणा दुकाने सुरू असतात. त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे काम ग्रामपंचायतीचे आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावात ॲन्टी कोरोना फोर्स दिसेनाशी झाला आहे.
गावात पोलिसांची गस्त...
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे व पोलीस कर्मचारी चौकशी करून तंबी देत आहेत. तसेच सकाळी, सायंकाळी, रात्रीच्या वेळी पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.