कासार सिरशी येथे पोलिसांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:48+5:302021-09-13T04:19:48+5:30

हरवाडी येथे आपला गणपतीचे रक्तदान शिबिर रेणापूर : तालुक्यातील हारवाडी येथील आपला गणपतीच्या पदाधिकाऱ्यांनी व युवकांनी गणेशोत्सवाचे औचित्य ...

Police felicitated at Kasar Sirshi | कासार सिरशी येथे पोलिसांचा सत्कार

कासार सिरशी येथे पोलिसांचा सत्कार

हरवाडी येथे आपला गणपतीचे रक्तदान शिबिर

रेणापूर : तालुक्यातील हारवाडी येथील आपला गणपतीच्या पदाधिकाऱ्यांनी व युवकांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून ४५ जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी हणमंत कातपुरे, विवेक माने, कृष्णा भंडे, प्रवीण कातपुरे, अजय चिंचळे, सुग्रीव भंडे, अनिरुद्ध माने, कृष्णा माने, सुदन ढोरमारे, सतीश चोथवे, उमाकांत गंगथडे, ग्यानदेव कातपुरे, अर्जुन कातपुरे, विलास गंगथडे, गुणवंत माने, चंद्रकांत गंगथडे, गणेश हाके, नानासाहेब माने, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाचे उद्घाटन

अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील अंधोरी ते कावळवाडी या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून दीड कोटी रुपयाचे काम झाले. या कामाचे उद्घाटन आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपअभियंता मुकदमे, सरपंच प्रदीप चौकटे, कावळवाडीचे सरपंच बाळू गुट्टे, माधव जाधव, एच. आर. पाटील, सांब महाजन, दत्तराव शिंगडे, सत्यभूषण शिरसागर, चेअरमन बापूराव सारोळे, बाळू पाटील, एलबाजी नरवाडे, आदी उपस्थित होते.

नंदाबाई खांडेकर यांचे निधन

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील खानापूर (मो.) येथील माजी सरपंच नंदाबाई नाथराव खांडेकर (वय ४५) यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Police felicitated at Kasar Sirshi