- राजकुमार जाेंधळे
लातूर : दाेन दिवसांपूर्वी लातुरात जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या १५७ पुड्या मुंबईहून आणलेल्या आहेत. यातील तीन पैकी दाेन आराेपी मुंबई येथील आहेत. दरम्यान, दाेघे काेठडीत, तर एकाचा शाेध सुरू असून, तपास यंत्रणा ड्रग्ज प्रकरणातील गुन्हेगारांची पाळेमुळे खाेदून काढत आहेत. पथकाच्या कारवाईत शनिवारी तीन ग्राहकही हाती लागल्याने लवकरच नेटवर्क उघडकीस येणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने एलआयीसी काॅलीनत छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. आता विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे. पहिल्या टप्प्यात ड्रग्ज मुंबईतून आणले जात असल्याच्या शक्यतेला दुजाेरा मिळाला आहे. मुंबईतील एक आराेपी पाेलिस काेठडीत असून, जबाबात ड्रग्ज नेमके काेठून आणले, त्याचा पुरवठा कसा केला जाताे याचे धागेदाेरे पाेलिस शाेधून काढत आहेत. त्यात स्थानिक गुन्हे शाखेने तीन ग्राहकांना ताब्यात घेऊन चाैकशी सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर तसेच विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक संताेष पाटील यांची पथके आराेपींच्या मागावर असून, ड्रग्जचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे.
पाच हजारांची पुडी घेणारे ग्राहक हे विद्यार्थी नाहीत...प्राथमिक अंदाजानुसार पाच हजारांची पुडी घेणारे आराेपी हे गुन्हेगारी कारवाया करणारे, भरकटलेले तरुण तसेच काही वयस्क मंडळी असल्याचा संशय पाेलिसांना हाेता. पाेलिस सर्व शक्यता पडताळून पाहत असून, शनिवारी ताब्यात घेतलेले ग्राहक गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा स्वत:च्या नशेसाठी ड्रग्जची मागणी करणारे असल्याचे सूत्रांनी सांगितले.