जळकोट तालुक्यातील ६५ शाळांत नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:01+5:302021-01-04T04:18:01+5:30
जळकोट तालुक्यात यू-डायस असलेल्या १२३ शाळा आहेत. या शाळांतील स्वयंपाकगृह, शौचालयास नळकनेक्शन देण्यात यावे, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या ...

जळकोट तालुक्यातील ६५ शाळांत नळजोडणी
जळकोट तालुक्यात यू-डायस असलेल्या १२३ शाळा आहेत. या शाळांतील स्वयंपाकगृह, शौचालयास नळकनेक्शन देण्यात यावे, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील शाळा, अंगणवाडीस पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
तसेच घर तिथे नळ हे अभियान सध्या सुरु आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून ५० टक्के खर्च पिण्याच्या शुद्ध पाण्यावर करावयाचा आहे. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्रत्येक गावाची माहिती घेऊन ज्या गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना रखडल्या आहेत, तिथे त्या योजना पूर्ववत करणे, प्रत्येक घराला नळ कनेक्शन देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता गर्जे, कनिष्ठ अभियंता अजमुद्दीन वस्ताद यांनी दिली. यासंदर्भात सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविकांसोबत बैठक घेऊन चर्चा करीत आहेत.