अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे पिकावर फिरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:21 IST2021-07-31T04:21:08+5:302021-07-31T04:21:08+5:30
तालुक्यातील मसलगा येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती करीत टोकण पद्धतीने अडीच एकर जमिनीवर सोयाबीनची ...

अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे पिकावर फिरविला नांगर
तालुक्यातील मसलगा येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती करीत टोकण पद्धतीने अडीच एकर जमिनीवर सोयाबीनची लागवड केली होती. दरम्यान, पाऊसही चांगला पडला. त्यामुळे पीक चांगले बहरले होते. त्यामुळे चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा त्यांना लागली होती. मात्र, गेल्या आठवड्यात तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही ठिकाणची पिके आणि माती वाहून गेली. त्याचबरोबर काही ठिकाणच्या पिकांत पाणी साचले.
दरम्यान, शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या शेतातील सोयाबीन पिकात पाणी साचल्याने पीक पिवळे पडले. त्यामुळे वाढ खुंटली आहे. परिणामी, उत्पादन मिळणार नाही, हे जाणून घेऊन निराश झालेल्या साळुंके यांनी सोयाबीन पिकावर नांगर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्याकडे त्यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे मसलगा परिसरातील अन्य शेतक-यांचेही नुकसान झाले आहे.