नैसर्गिक ऑक्सिजनसाठी एक हजार रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:02+5:302021-07-17T04:17:02+5:30
रोकडा सावरगाव येथील संत बुवासाहेब महाराज मंदिर ते संत बापदेव महाराज मंदिरापर्यंत वड, पिंपळ, कडुनिंब, करंज अशा एक हजार ...

नैसर्गिक ऑक्सिजनसाठी एक हजार रोपांची लागवड
रोकडा सावरगाव येथील संत बुवासाहेब महाराज मंदिर ते संत बापदेव महाराज मंदिरापर्यंत वड, पिंपळ, कडुनिंब, करंज अशा एक हजार रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नामचे विलास चामे, निवृत्त न्यायाधीश विजयकुमार बोडके, निवृत्त पाटबंधारे अभियंता राम घोटे, पत्रकार शशिकांत घोणसे पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास वनविभागाचे वनपाल तेलंग, वनाधिकारी होनराव, दीपकराव जाधव, सुशील घोटे, डॉ. सुधाकर मुरुडकर, राम बेल्लाळे, शेखर जाधव, ॲड. सुनील केंद्रे, ग्रामविकास अधिकारी करुळेकर, उत्तमराव घोटे, भाऊसाहेब जाधव, प्रवीण जाधव, युवराज घोमरे, राहुल बेल्लाळे, मोहन मुरुडकर, श्रीरंग जाधव, शेषराव जाधव, शिवकुमार पाटील, सानप, भारती आदींची उपस्थिती होती.
गावक-यांचा संवर्धनाचा निर्धार...
गावातील प्रत्येकाने झाड दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार केला आहे. पुढील वर्षी या झाडांचा वाढदिवस करण्याचा संकल्पही ग्रामस्थांनी केला. सह्याद्री- देवराई प्रतिष्ठानने त्यासाठी सर्व वृक्ष उपलब्ध करुन दिले आहेत.