दवणगाव येथे ५१ नारळ झाडांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:16+5:302021-06-04T04:16:16+5:30
शहर महापालिकेत अभिवादन कार्यक्रम लातूर : शहर महानगरपालिकेतर्फे माजी केंद्रीय मंत्री व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...

दवणगाव येथे ५१ नारळ झाडांचे रोपण
शहर महापालिकेत अभिवादन कार्यक्रम
लातूर : शहर महानगरपालिकेतर्फे माजी केंद्रीय मंत्री व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपा उपायुक्त मयुरा शिंदेकर यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला मनपाच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड, खदीर शेख, हाजी शेख, महेश शर्मा, अभिमन्यू पाटील, सुधाकर मदने, अशोक साठे आदींसह महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राजेंद्र पांचाळ यांचा दयानंद महाविद्यालयात सत्कार
लातूर : येथील दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र शंकर पांचाळ व प्रा. रत्नाकर किशनराव कांबळे यांना नांदेड येथील स्वाराती मराठवाडा विद्यापीठाकडून पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. दिलीप जगताप, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद माने, प्रा. हेमंत वरुडकर, डॉ. प्रमोद माने, प्रा. डी. एम. सूर्यवंशी, प्रा. बी. ए. सरवदे, प्रा. व्यंकट कैले, प्रा. एस. डी. पवार, प्रा. एस. ए. कदम, डॉ. कोमल गोमारे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.