ट्रीगार्डसह १०१ झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:23+5:302021-03-22T04:18:23+5:30
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य समद पटेल, डॉ.कल्याण बरमदे, सुंदर पाटील कव्हेकर, विशाल राठी ...

ट्रीगार्डसह १०१ झाडांची लागवड
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य समद पटेल, डॉ.कल्याण बरमदे, सुंदर पाटील कव्हेकर, विशाल राठी हे उपस्थित होते. या उपक्रमासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी खड्डे खोदणे, झाडे आणणे, झाडांची लागवड, ट्रीगार्ड बनविणे, ट्रीगार्डला रंग देणे, काळी माती टाकणे, नावाच्या पाट्या लावणे, झाडांना पाणी देणे ही कामे श्रमदानातून केली.
गेल्या वर्षी श्यामनगर परिसरातील पशुवैद्यकीय चिकित्सालयात १०१ फळांची झाडे लावण्यात आली होती. त्या सर्व झाडांना एक वर्ष पूर्ण झाले असून, ती बहरत आहेत. या सर्व झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात आले.
या उपक्रमासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ.पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, गंगाधर पवार, कल्पना फरकांडे, बाळासाहेब बावणे, बळीराम दगडे, ऋषिकेश दरेकर, मनमोहन डागा, प्रमोद निपानीकर, शिवशंकर सुफलकर, सीताराम कंजे, सुलेखा कारेपूरकर, आशा अयाचित, प्रिया नाईक, मोहिनी देवनाळे, सीमा धर्माधिकारी, महेश भोकरे, विजयकुमार कठारे, मोईज मिर्झा, दयाराम सुडे, खाजाखॉ पठान, प्रसाद शिंदे, कृष्णा वंजारे, विक्रांत भूमकर, सार्थक शिंदे, प्रसाद श्रीमंगले, डी.एम. पाटील, ऋषिकेश पोतदार, भूषण पाटील, शैलेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.