दिव्यांगांना निरामय योजनेचा लाभ द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:26+5:302021-06-03T04:15:26+5:30
राष्ट्रीय पातळीवर दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांची ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय न्यास अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे नोडल ...

दिव्यांगांना निरामय योजनेचा लाभ द्यावा
राष्ट्रीय पातळीवर दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांची ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय न्यास अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे नोडल संस्था म्हणून रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे संवेदना प्रकल्प कार्यरत आहे. यावेळी सहसंचालक नवनीतकुमारजी, राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण आय़ुक्तालयाचे सहआयुक्त सचिन शेळके, संवेदना प्रकल्प कार्यवाह सुरेश पाटील, पुरुषोत्तम बुर्डे यांची उपस्थिती होती.
यावेळी शुक्ला म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्तर समितीचे गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात बौद्धिक दिव्यांगांना देण्यात येणाऱे कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली. नवनीतकुमार यांनी राष्ट्रीय न्यासच्या योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सहआयुक्त शेळके यांनी प्रलंबित संस्थांची नूतनीकरणाची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात दिव्यांगांकरिता विशेष लसीकरण मोहीम सुरू असून यामध्ये जिल्ह्यातील ४ हजार १०८ दिव्यांगांना लस दिली जात आहे. संवेदना प्रकल्पामध्ये दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पालकांसाठी विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे संवेदना प्रकल्प कार्यवाह सुरेश पाटील यांनी सांगितले. बैठकीचे संचालन संवेदना प्रकल्पातील व्यंकट लामजणे यांनी केले. आभार डॉ. योगेश निटुरकर यांनी मानले.