दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:30+5:302021-04-13T04:18:30+5:30
ट्रॅक्टर शेतातून का नेले म्हणून मारहाण लातूर : आमच्या शेतातून ट्रॅक्टर का नेले, आता जमीन निबर झाली आहे. ती ...

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी
ट्रॅक्टर शेतातून का नेले म्हणून मारहाण
लातूर : आमच्या शेतातून ट्रॅक्टर का नेले, आता जमीन निबर झाली आहे. ती मुरटन घालून द्या, असे समजून सांगितले असता आरोपींनी संगनमत करून नागेवाडी शिवारात एकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी शिवारात फिर्यादी शेख महेबूब सय्यद यांनी आमच्या शेतातून ट्रॅक्टर का नेला, जमीन निबर होते त्यावर मुरटन घालून द्या, असे समजून सांगत असताना आरोपींनी फिर्यादी शेख यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून मुन्ना कवठाळे व त्यांच्या मुलाविरुद्ध (दोघेही रा. नागेवाडी, ता. शिरूर अनंतपाळ) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. पाटील करीत आहेत.
शेतात टेम्पो का घेऊन आलास म्हणून मारहाण
लातूर : तू आमच्या शेतात टेम्पो का घेऊन आलास म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुका मार दिल्याची घटना बामणी येथे घडली. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेतात टेम्पो का घेऊन आलास म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने फिर्यादीला तसेच फिर्यादीच्या आजोबाला ही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तुला खलास करतो, असे जीवे मारण्याचीही धमकी दिली, अशी फिर्याद सादिक इसाक शेख यांनी निलंगा पोलिसात दिली. त्यावरून गोविंद मनोहर जाधव व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. एच.एम. पठाण करीत आहेत.