शेंगदाणे, साखर, डाळींचे दर स्थिर; भाजीपाला बाजारात आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST2021-02-22T04:13:35+5:302021-02-22T04:13:35+5:30

लातूर : इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागत आहे. त्यातच शेंगदाणे, साखर आणि डाळींचे दर स्थिर आहेत. ही ...

Peanut, sugar, pulses prices stable; Vegetable market inflows increased | शेंगदाणे, साखर, डाळींचे दर स्थिर; भाजीपाला बाजारात आवक वाढली

शेंगदाणे, साखर, डाळींचे दर स्थिर; भाजीपाला बाजारात आवक वाढली

लातूर : इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागत आहे. त्यातच शेंगदाणे, साखर आणि डाळींचे दर स्थिर आहेत. ही दिलासादायक बाब असून, भाजीपाल्याची आवकही वाढली असल्याचे चित्र आहे.

बाजारपेठेत सध्या किराणा, भाजीपाला, फळांना मागणी वाढली आहे. शेंगदाणे १०० ते ११०, साखर ३५ ते ३६, रवा ३२ ते ३५, गोडतेल १२० ते १३०, तूरडाळ ११० ते १२०, मसूरडाळ १०० ते ११०, मूगडाळ ११५ ते १२०, चनाडाळ ६५ ते ७५, पोहे ३८ ते ४०, मैदा ३४ ते ३६, शाबुदाणा ५५ ते ६० तर खोबरे १८० रुपये प्रति किलो आहे.

भाजीपाला बाजारात हिरवी मिरची ४० ते ५०, मेथी १०, पालक १५, करडई १५, पत्ताकोबी १०, भेंडी ५०, वांगी २०, काकडी ३०, गवार ६०, कांदे ४० ते ६०, बटाटा २० ते ३०, तर टोमॅटो १० ते १५ रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहेत. वातावरणातील बदलामुळे पिकांवर परिणाम होत असला तरी भाजीपाल्याची आवक वाढत आहे. त्यामुळे दरही स्थिर असल्याचे लातूर शहरातील चित्र आहे.

फळबाजारात सध्या सफरचंद १५० ते २००, संत्री ६० ते ८०, डाळिंब १८०, २००, पपई २० रुपये, खरबूज ३० रुपये किलो, मोसंबी १२० रुपये, अननस ८० रुपये, चिकू ४० ते ६०, स्वीट काॅर्न १० ते २० रुपये, टरबूज प्रति तीन किलो ६० रुपये, द्राक्ष ६० ते ८० रुपये किलो आहे. सध्या फळ बाजारात आवकही वाढल्याचे चित्र आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढीव जात आहे. किराणा मालाच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे. मागणीही वाढत आहे.

- महेश पाटील,

दुकानदार

फळ बाजारात सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू, केळी, अननस, द्राक्ष, टरबूज, खरबूज आदींची आवक आहे. दरात चढ-उतार असून, मागणी वाढत आहे.

- सलमान बागवान,

फळविक्रेता

शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. दरही स्थिर आहेत. कांद्याचे दर वाढले असले तरी बटाटा आणि टोमॅटो दर जैसे थे आहेत.

- सुधाकर शेंडगे,

भाजीपाला विक्रेता

Web Title: Peanut, sugar, pulses prices stable; Vegetable market inflows increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.