देवणी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:16+5:302021-05-12T04:20:16+5:30

अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शेख जिलानी यांच्यासह हाफिज ...

Peace committee meeting at Devani police station | देवणी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

देवणी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शेख जिलानी यांच्यासह हाफिज नईमसाब रहेमानसाब, हाफिज मोहम्मद खाजामिया रजक मौलाना, यायाखान पठाण, अलमखान आयुब खान यांच्यासह मुजीब मोमीन, बाबूराव इंगोले, देविदास पतंगे, रशीद मल्लेवाले, जावेद तांबोळी, मगदूम पठाण, सय्यद अहमद, इस्माईल तांबोळी, जावेद येरवळे, माजित तांबोळी, शिवाजी राठोड, दाऊद उंटवाले, मेजर पठाण, अरबाज जाकीर, बागवान पठाण, दस्तगीर तांबोळी, अजीज अल्ताफ, आदी उपस्थित होते. तसेच पोलीस उपनिरीक्षक रंजित काथवटे, पोहेकॉ. विनायक कांबळे, सर्फराज गोलंदाज, सतीश पवार, गणेश बुजारे, आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक कामठेवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम समजावून सांगून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी नियमांचे पालन करीत सहकार्य करू, असे आश्वासित केले.

Web Title: Peace committee meeting at Devani police station