मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST2021-03-19T04:19:00+5:302021-03-19T04:19:00+5:30

मुंबई व पुणे जिल्ह्यात सध्या कोविड १९ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. लातूरचा मुंबई आणि पुण्याशी दैनंदिन ...

Passengers coming from Mumbai, Pune will be checked | मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची होणार तपासणी

मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची होणार तपासणी

मुंबई व पुणे जिल्ह्यात सध्या कोविड १९ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. लातूरचा मुंबई आणि पुण्याशी दैनंदिन संबंध असतो. जवळपास ६० खासगी ट्रॅव्हल्स दररोज लातूर-पुणे ये-जा करत असतात. यातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केली जाते.

या प्रवाशांपैकी कोणाला कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यातून धोका होऊ नये यासाठी महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे दररोज पुण्याहून लातुरात येणाऱ्या प्रत्येक गाडीतील प्रवाशांची चौकशी केली जाणार आहे. यासाठी पथक प्रमुख म्हणून आरोग्य सहाय्यक व्ही.पी. कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा कर्मचारी त्यांना सहकार्य करणार आहेत. पीव्हीआर चौक येथे सकाळी ५ ते ८.३० या कालावधीत हा उपक्रम राबवला जाणार आहे. पोलिसांच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात पोलीस गाडी थांबवतील. त्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी गाडीमध्ये जाऊन प्रवाशांपैकी कोणाला सर्दी, खोकला,अंगदुखी, ताप यासारखी लक्षणे आहेत का याची विचारणा करतील. लक्षणे आढळली तर संबंधित प्रवाशाला कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले जाईल.

शहरात चार ठिकाणी कोरोना चाचणी...

लातूर शहरामध्ये चार ठिकाणी कोरोना चाचणी केली जात आहे. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह, औसा रोड,लातूर,

मनपा दवाखाना इंडिया नगर, समाज कल्याण वसतिगृह मार्केट यार्ड व पटेल चौकातील मनपा रुग्णालयात कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

Web Title: Passengers coming from Mumbai, Pune will be checked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.