उदगीर मार्केट यार्डात परूचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:58+5:302021-08-23T04:22:58+5:30
यावर्षी जून महिन्यात खरिपाच्या पिकाची पेरणी वेळेवर झाली. परंतु मागील २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने या भागातील शेतकरी हवालदिल ...

उदगीर मार्केट यार्डात परूचा कार्यक्रम
यावर्षी जून महिन्यात खरिपाच्या पिकाची पेरणी वेळेवर झाली. परंतु मागील २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, मागील तीन दिवसांपासून तालुक्यात कमी - जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सोयाबीनसह खरिपाच्या पिकावरील संकट तूर्त टळले आहे. वरुण राजाची अशीच कृपादृष्टी राहावी म्हणून मार्केट यार्डात व्यापाऱ्यांतर्फे परुच्या महाप्रसाद (अन्नदाना)चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आडत असोसिएशन, दालमिल असोसिएशन, गुमास्ता संघ, हमाल मापाडी संघटनांनी पुढाकार घेतला. यावेळी संभाजी घोगरे, गुरुनाथ बिरादार, गुरुनाथ बिरादार माळेवाडीकर, शेषेराव बिरादार, पी. पी. पाटील, रामदास काळगापुरे, ज्ञानोबा गुणाले, गौतम पिंपरे, सुरेश डोंगरे, मल्लिकार्जुन काळगापुरे, शिवा पेठे, उमेश पांढरे, शरणप्पा कुरुळे, हानमंतराव घोगरे, मल्लिकार्जुन रेगुडे, शिवशंकर कवठाळे, बालाजी बिरादार, महेश महाजन, औदुंबर येरनाळे, रमेश पाटील यांनी पुढाकार घेऊन अन्नदानाचा कार्यक्रम यशस्वी केला.