शहरातील भाजपा कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:47+5:302021-02-06T04:34:47+5:30
‘विद्रोह असत्याशी’ ग्रंथाचे प्रकाशन लातूर : जी.एस. कांबळे लिखित ‘विद्रोह असत्याशी’ या ग्रंथाचे प्रकाशन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, ...

शहरातील भाजपा कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग
‘विद्रोह असत्याशी’ ग्रंथाचे प्रकाशन
लातूर : जी.एस. कांबळे लिखित ‘विद्रोह असत्याशी’ या ग्रंथाचे प्रकाशन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, मुक्ता साळवे यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून लातूर येथे करण्यात आले. यावेळी औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयातील प्रा. संगीता दोंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.एस. नरसिंगे होते. जी.एस. कांबळे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीचे पाईक होते. त्यांनी सबंध महाराष्ट्रभर समाज सेवेसाठी संचार केला. प्रास्ताविक व्ही.बी. अजनीकर यांनी केले. कार्यक्रमास छगन घोडके, राहुल गायकवाड, माणिक वाघमारे, व्ही.के. वाघ, के.ई. हरदास, पी.एल. दाढेराव, अरुण कांबळे, प्रा. उत्तमकुमार कांबळे, बी.डी. सूर्यवंशी, महेश कांबळे, सावळा कासारे, बापू नरसिंगे, एन.व्ही. कवठेकर, प्रा. बापू गायकवाड, राजेंद्र हजारे, तुळशीराम घोडके, गोविंद वाघमारे उपस्थत होते.