आदर्श कुटुंबाच्या पालक (सखी मंच ॲचिव्हर्स २०२१ साठी लेख)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST2021-02-05T06:26:25+5:302021-02-05T06:26:25+5:30
सौ. रजनी रेड्डी यांनी १५ वर्षांपासून राजकारणात भाजप कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग घेतला. एकवेळ नगरसेविका म्हणूनही काम केले. बचत ...

आदर्श कुटुंबाच्या पालक (सखी मंच ॲचिव्हर्स २०२१ साठी लेख)
सौ. रजनी रेड्डी यांनी १५ वर्षांपासून राजकारणात भाजप कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग घेतला. एकवेळ नगरसेविका म्हणूनही काम केले. बचत गटांच्या माध्यमातून मजूर आणि मागास प्रवर्गातील महिलांसाठी जमेल तितके काम केले. त्यांचा मुलगा डॉ. वैभव रेड्डी यांनी अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून अहमदपूर येथे सेवा देण्यास सुरुवात केली, हा त्यांच्या आयुष्यातील आनंद क्षण होता. संयम, चिकाटी आणि शांतपणे परिस्थितीचे अवलोकन करून रजनी रेड्डी यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. मुलगा डॉ. वैभव, सून पूजा रेड्डी, नातू वेदांत, वरदराज, मुलगी वैशाली भारत चामे, जावई अॅड. भारत चामे, नात डॉ. सोनल, नातू अॅड. अजिंक्य तसेच दुसरी मुलगी वर्षा संजीव रेड्डी, जावई डॉ. संजीव मच्छिंद्र रेड्डी, नात डॉ. प्रांजली, सिद्धी असा समृद्ध परिवार लाभलेल्या रजनी रेड्डी यांच्या पाठीशी पती विजय रेड्डी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांना राजकरणात आणि समाजकारणात सहभाग वाढवायचा आहे. विशेष म्हणजे शेतीत नवनवीन प्रयोग करायचे आहेत. आजही कुटुंबाची, हॉस्पिटलची आणि शेतीवाडीची संपूर्ण आर्थिक जबाबदारी मुलांनी व सूनबाईंनी सौ. रजनी यांच्यावर सोपविली आहे. अशा एका आदर्श परिवाराच्या सौ. रजनी या पालक आहेत. त्या नेहमी इतरांनाही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मुलांना नकार ऐकायला, स्वीकारायला, पचवायला शिकवा. आपली कुटुंब व्यवस्था आणि संस्कृती याचे महत्व पुढच्या पिढ्यांना पटवून द्या. विशेषत्वाने वडिलधाऱ्यांचा मान ठेवण्याबद्दल कटाक्षाने लक्ष द्या, हा सौ. रजनी रेड्डी यांचा विचार आहे.
- सौ. रजनी विजय रेड्डी