शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
3
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
5
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
6
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
7
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
8
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
9
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
10
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
11
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
12
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
13
वाहन चालकांनो, ‘आरटीओ’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
14
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
15
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
16
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
17
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
18
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
19
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
20
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

पन्नालाल सुराणा: अनाथांच्या उत्कर्षासाठी राबणारा 'बाप'माणूस काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:15 IST

आम्ही पुन्हा पोरके झालो, बालकांनी मांडल्या भावना

- पांडुरंग पोळेनळदुर्ग : राजकारणापेक्षा समाजसेवा व आधुनिक निधर्मी समाज रचना उदयास यावी, यासाठी अहोरात्र झटणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा (भाऊ) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. या अकल्पित आघाताने त्यांच्या छायेखाली वाढलेले 'आपलं घर' दुःखाच्या सावटात असून, राष्ट्र सेवा दलाच्या साथींचे अन् इथल्या बालकांचे आसवं थांबता थांबेनात. 'बाप' माणसाच्या अशा एक्झिटने त्यांचा सबंध परिवार सुन्न झाला आहे.

१९९३ साली किल्लारी व उमरगा परिसरात प्रलयंकारी भूकंप झाला. त्यात शेकडो लोक जमिनीत गाडले गेले. त्यातून वाचलेली लहान मुले, विवाहित मुली यांची संख्या उल्लेखनीय होती. माय-बापाविना पोरक्या झालेल्या बालकांना पन्नालाल सुराणा यांच्या रूपाने नाथ मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अनाथ मुलांना आश्रय मिळावा, यासाठी नळदुर्गजवळील बालाघाट डोंगररांगांच्या माथ्यावरील पाच एकर जमीन दिली आणि त्या ठिकाणी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मोठे बालकाश्रम उभे झाले. सरकारी टेकूवर हा तंबू टिकणार नाही, याची जाणीव झालेल्या भाऊंनी त्यांनी उभ्या केलेल्या कार्यात अडसर येऊ नये यासाठी जवळपास तीन कोटी रुपयांच्या ठेवी मासिक प्राप्ती होईल, अशा प्रकारे बॅंकांत ठेवून आर्थिक तरतूद करून ठेवली. यातूनच आजवर सुमारे ३ हजारांवर विद्यार्थी येथून स्वावलंबी बनून बाहेर पडले. त्यांच्या अचानक जाण्याने आपलं घरवर मोठा आघात झाला आहे.

शेतीमातीत रमले, विद्यार्थीही घडवलेपन्नालाल भाऊंनी बांधबंदिस्ती, वृक्षारोपण, बचत, वैचारिक प्रगल्भता, समाजातील बारकावे, स्वयंरोजगार, कला, क्रीडा, राजकारण, स्पर्धा परीक्षा, शिक्षण, शेती, रोजगार आदी क्षेत्रांत अनाथ मुलं, मुली मागे पडू नये, महिलांचे राहणीमान व प्रतिष्ठा वाढावी यासाठी प्रयत्न केले. शेतीत रमताना आपल्या विद्यार्थ्यांत शेतीमातीचे संस्कारही रुजवले. विधवा पुनर्विवाह, अनाथांचे आंतरजातीय विवाह घडवून आणत त्यांनी अनेकांचे संसारही उभे केले.

बसचा प्रवास अन् टपालपेटीशी नातेभाऊंनी अखेरच्या श्वासापर्यंत लालपरी आणि पोस्टाच्या लाल पेटीशी असलेले नाते कायम राखले. त्यांचा प्रत्येक प्रवास हा एसटीनेच ठरलेला असायचा. शिवाय, मोबाइलच्या जमान्यातही ते पोस्टकार्डचा वापर करीत राहिले. याद्वारे बस आणि टपालपेटीशी आपले नाते आजीवन टिकवून ठेवले.

आमचे वडील आम्हाला पुन्हा सोडून गेले...संघटन कौशल्य, व्यासंगी वृत्ती, पितृत्वासोबतच मातृत्वाची भावना, चुकलं तर न रागावता त्या सुधारणा करणारे मार्गदर्शन करणाऱ्या भाऊंच्या निधनाने समाजवादी विचारवंतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.-अजित शिंदे, अध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्र सेवा दल

गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि दानशूर वृत्ती असलेले पन्नालाल भाऊ सुराणा यांचे निधन झाल्याने आम्हीं मायेला पोरके झालो आहोत.- विलास वकील, व्यवस्थापक, आपलं घर.

या प्रकल्पात मी मागच्या वर्षी दाखल झाले. भाऊ सतत अभ्यास घेत, महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देत, समाजात कसं राहायचं, कसं बोलायचं, संयम आणि नकार कशा प्रकारे हाताळायचे याबाबत खूप मार्गदर्शन करायचे. भाऊंच्या निधनाने आम्ही पुन्हा पोरके झालो.- शामबाला नरवटे, इयत्ता ९ वी, आपलं घर

दंगा-मस्ती करताना समजावून सांगत आणि अभ्यास करून घेत. जेवला का नाही, अशी विचारणा करणारे भाऊ आमच्यात आज नाहीत. आता मला पुन्हा माझे वडील मला सोडून पुन्हा गेले, असे वारंवार वाटते आहे.- समर्थ स्वामी, इयत्ता ८ वी, आपलं घर

English
हिंदी सारांश
Web Title : Pannalal Surana: Father figure for orphans, social worker, passes away.

Web Summary : Social worker Pannalal Surana, who dedicated his life to orphans' betterment, passed away. He established 'Apla Ghar' after the 1993 earthquake, providing refuge and education to thousands of children. His focus was on holistic development and self-reliance.
टॅग्स :laturलातूर