दोन वर्षांत सव्वा कोटींचा फटका...
गेल्या दोन वर्षांपासून आषाढी वारीसाठी बसेसच्या फेऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे लातूर मंडळाला सव्वा कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. मात्र, वारीवर निर्बंध असल्याने यंदाही वारीसाठी बसेस सोडलेल्या नाहीत.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक
दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जाणाऱ्या बसेस - ११८
रुपये उत्पन्न मिळायचे एसटी महामंडळाला - ६६ लाख ९२ हजार
एसटीतून दरवर्षी प्रवासी प्रवास करायचे - ६५ हजार ६५७
दरवर्षी ६६ हजार भाविक जातात दर्शनासाठी...
पंढरपूरला दर्शनासाठी लातूर जिल्ह्यातून दरवर्षी ६६ हजारहून अधिक भाविक जातात. मात्र, सलग दोन वर्षांपासून वारीसाठी बसेस सोडलेल्या नाहीत.
२०१९ मध्ये ११८ बसेस सोडण्यात आल्या होत्या. २ लाख १४ हजार ३९८ किमीचा प्रवास झाला होता. त्यामधून ६६ लाख ९२ हजार ७८३ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. दोन वर्षांपासून हे उत्पन्नही पदरी पडलेेले नाही.
वारकऱ्यांचेही गावी मन रमेना...
विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीमध्ये गेल्या १५ वर्षांपासून जातो. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून दर्शनासाठी जाता आले नाही. विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. - अण्णा महामुनी, वारकरी
कोरोनामुळे दोन वर्षांपासून आषाढी वारीला जाऊ शकलो नाही, याचे दु:ख आहे. गेल्या २५ वर्षांपासून न चुकता वारीला जात असतो. वारीच्या आशेने घरी मन रमत नसून, पांडुरंगाच्या भेटीची प्रतीक्षा लागली आहे. - बालाजी जाधव, वारकरी