कासारशिरसीच्या सरपंचपदी पांचाळ, लक्कडहारे उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST2021-02-13T04:19:25+5:302021-02-13T04:19:25+5:30
निलंगा तालुक्यातील दुस-या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून कासारशिरशीकडे पाहिले जाते. येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची असून निवडणुकीत महाविकास आघाडीचे ...

कासारशिरसीच्या सरपंचपदी पांचाळ, लक्कडहारे उपसरपंच
निलंगा तालुक्यातील दुस-या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून कासारशिरशीकडे पाहिले जाते. येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची असून निवडणुकीत महाविकास आघाडीचे १७ पैकी १२ उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले. अध्यासी अधिकारी विशाल ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची बैठक शुक्रवारी बोलाविण्यात आली होती. यावेळी सरपंच आणि उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी दिपाली पांचाळ तर उपसरपंचपदी बडेसाब लक्कडहारे यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिका-यांना ग्रामसेवक हणमंत ढोले, तलाठी मधुकर सूर्यवंशी यांनी सहाय्य केले. या निवडीनंतर नूतन पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विरेश चिंचनसुरे, विवेक कोकणे, पृथ्वीराज सरवदे, सुरेश बरकंबे, ज्योती चिंचनसुरे, मोनाली मडोळे, प्रभावती बोळशट्टे, मुमताजबी नासरजंग, सविता गायकवाड, ममता डोंबाळे यांच्यासह पॅनल प्रमुख राजकुमार चिंचनसुरे, हुसेन सय्यद, प्रकाश होळकुंदे, योगेश चिंचनसुरे, भीमराव पाटील, दाऊद सय्यद, संजय गोला, सुधीर चिंचनसुरे, सुरेश विजापुरे, हाजुलाल नासरजंग, श्रीकांत चिंचनसुरे, घनश्याम गायकवाड आदी उपस्थित होेते.
बिनविरोध निवडी...
ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १२ जागा या महाविकास आघाडीस मिळाल्याने गुरुवारी सरपंच व उपसरपंचाची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर नूतन सरपंच व उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.