शिवलीतील पाणंद रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:57+5:302021-04-21T04:19:57+5:30
दोन महिन्यापूर्वी आमदार अभिमन्यू पवार व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी औसा व निलंगा तालुक्यातील शेत रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ ...

शिवलीतील पाणंद रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात
दोन महिन्यापूर्वी आमदार अभिमन्यू पवार व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी औसा व निलंगा तालुक्यातील शेत रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ केला होता. त्यामुळे या दोन तालुक्यांतील काही शेत रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. पहिल्या टप्प्यात त्या रस्त्यांचे मातीकाम पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
शिवली (ता. औसा) येथील वडजी रस्ता ते शिवली-भादा शिवरस्ता आहे. रस्त्यालगत शेतकऱ्यांची शेती आहे. या रस्त्याची गाव नकाशावर नोंद असून त्यावर काही वर्षांपासून येथील शेतकऱ्यांकडून अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून एकाचवेळी दोन बैलगाड्याही ये-जा करू शकत नाहीत. त्यामुळे अतिक्रमण दूर करावे तसेच गाव नकाशाप्रमाणे खुणा करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात यावा, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.