रेकाॅर्डवरील फरार आराेपींचे पाेलिसांकडून सर्च ऑपरेशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:25+5:302021-09-14T04:24:25+5:30

लातूर जिल्ह्यातील रेकाॅर्डवर असलेल्या आणि फरार असलेल्या आराेपींचा डाटा संकलित करण्यात आला आहे. श्री गणेशाेत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ...

Paelis search operation for absconding accused on record! | रेकाॅर्डवरील फरार आराेपींचे पाेलिसांकडून सर्च ऑपरेशन !

रेकाॅर्डवरील फरार आराेपींचे पाेलिसांकडून सर्च ऑपरेशन !

लातूर जिल्ह्यातील रेकाॅर्डवर असलेल्या आणि फरार असलेल्या आराेपींचा डाटा संकलित करण्यात आला आहे. श्री गणेशाेत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या फरार आराेपींचा शाेध घेतला जात आहे. आतपर्यंत केवळ १४ आराेपींच्या मुसक्या आवळण्यात विशेष पाेलीस पथकाला यश आले आहे. अद्यापही अनेक फरार आराेपींच्या मागावर ही पाेलीस पथके आहेत. मात्र, त्यांच्या हाती हे आराेपी लागत नसल्याचे चित्र आहे. सध्याला घरफाेडी, माेटारसायकल, गंठण पळविणे आणि माेबाइल पळविणाऱ्या टाेळींचा छडा लावण्यात अद्यापही पाेलिसांना यश आले नाही. एखादा आराेपी हाती लागत आहे. मात्र, म्हाेरक्या माेकाट राहत असल्याचे चित्र सध्याला आहे.

वीस वर्षांपासून आराेपी सापडेना...

लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून फरार असलेल्या आराेपींचा अद्यापही शाेध लागला नाही.

हे आराेपी गत दहा ते वीस वर्षांपासून पाेलीस दप्तरी फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पाेलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ते गुंगारा देत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा आणि पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांकडून गत दाेन महिन्यांत केवळ १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

खून, दराेडा, हाणामारी, प्राणघातक हल्ला प्रकरणातील अनेकजण पाेलिसांना चकवा देत फरार झाले आहेत.

मृत्यूनंतरही तपास सुरूच...

एखाद्या प्रकरणातील आराेपीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पाेलिसांना मिळते. मात्र, मृत्यूचे प्रमाणपत्र हाती लागत नाही. ताेपर्यंत पाेलिसांचा तपास, माग काढण्याची प्रक्रिया सुरूच असते. परिणामी, अनेक आराेपींबाबत विविध गुन्ह्यांमध्ये आराेपींच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच राहत असल्याचे समाेर आले आहे.

रेकाॅर्डवरील फरार आराेपींचा शाेध सुरू...

लातूर शहरातील ५ आणि ग्रामीण भागातील १८ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर गुन्ह्यातील आराेपी अद्यापही फरार आहेत. अशा आराेपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पाेलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मागावर आमची पाेलीस पथके आहेत. पाेलिसांच्या रेकाॅर्डवर असलेल्या मात्र फरार आराेपींच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर.

Web Title: Paelis search operation for absconding accused on record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.