काेराळवाडी येथे हातभट्टी अड्ड्यांवर पाेलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:21 IST2021-04-20T04:21:04+5:302021-04-20T04:21:04+5:30
पाेलिसांनी सांगितले की, निलंगा तालुक्यातील काेराळवाडी येथील शिवारात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी दारूची निर्मिती केली जात आहे, अशी माहिती पाेलीस ...

काेराळवाडी येथे हातभट्टी अड्ड्यांवर पाेलिसांचा छापा
पाेलिसांनी सांगितले की, निलंगा तालुक्यातील काेराळवाडी येथील शिवारात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी दारूची निर्मिती केली जात आहे, अशी माहिती पाेलीस प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि कासार शिरसी पाेलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे एकाच वेळी छापा टाकला. यावेळी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ५ हजार ६०० लिटर रसायन आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पाेलिसांनी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केले. याप्रकरणी कासार शिरसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मधुकर लिंबाजी मेलगिरे, हरिश्चंद्र लक्ष्मण रेवणे, युवराज श्रीपती रेवणे आणि विठ्ठल लिंबाजी मेलगिरे, सर्व रा. काेराळवाडी, ता. निलंगा यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रताप गरजे, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले, हरून लोहार, युसूफ शेख, खुर्रम काजी, यशपाल कांबळे, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे, प्रमोद तरडे, नागनाथ जांभळे, अहमद खान त्याचबराेबर कासारशिरशी येथील पोलीस अंमलदार गोरोबा घोरपडे, भीमाशंकर भोसले, विकास भोंग यांच्या पथकाने केली.