पु. अहिल्यादेवी विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:13+5:302021-02-05T06:23:13+5:30
अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्राचार्या रेखाताई तरडे होत्या. यावेळी भास्कर दिंडे, शिवकन्या संपत्ते, संभाजीराव लोहकरे, शोभा तांदळे, ...

पु. अहिल्यादेवी विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्राचार्या रेखाताई तरडे होत्या. यावेळी भास्कर दिंडे, शिवकन्या संपत्ते, संभाजीराव लोहकरे, शोभा तांदळे, पत्रकार शरद कासले, कौशल्या देवकते, संजय पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी तेजस दिंडे, सुदर्शन लोहकरे, ॠतुजा संपत्ते, प्रवीण तांदळे यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संतोष मुळे, सूत्रसंचालन दैवशाला शिंदे यांनी केले. आभार शेख जिलानी यांनी मानले. यशस्वीतेसाठी रमेश चेपुरे, संभाजी दुर्गे, अच्युत सुरनर, राजाराम बुर्ले, राजकुमार पनाळे, तुकाराम शिंगडे, अमोल सारोळे, प्रदीप रेड्डी, जनार्धन मासुळे, मिनल गोगडे, चिंतन गिरी, गजानन फुलारी, गणेश जाधव, हिदायत शेख, विश्वंभर सुरनर, विवेकानंद सुरनर आदींनी परिश्रम घेतले.
जिद्द, चिकाटी ठेवावी...
प्राचार्या रेखाताई तरडे म्हणाल्या, गुणवत्ता, ज्ञानाला महत्त्वाचे स्थान असून सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये परिश्रम करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी असणे आवश्यक आहे.