देवणी येथे ऑक्सिजन निर्मितीचा प्लान्ट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:37+5:302021-04-20T04:20:37+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख यांनी येथील कोविड सेंटरला भेट देऊन प्रशासनाकडून आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ...

देवणी येथे ऑक्सिजन निर्मितीचा प्लान्ट उभारणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख यांनी येथील कोविड सेंटरला भेट देऊन प्रशासनाकडून आढावा घेतला.
त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कोल्हे, नियोजन समितीचे सदस्य अभय साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल इंगोले, दिलीप पाटील नागराळकर, काशीनाथ मानकरी, मालबा घोणसे, गजानन भोपणीकर, वैजनाथ लुल्ले, अनिल कांबळे, राम भंडारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी दिलीप गुरमे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नीळकंठ सगर यांनी तालुक्यातील कोरोना संसर्गाची व प्रतिबंधाची माहिती दिली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्या मांडल्या. ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधेबाबतही नाराजी व्यक्त केली. तालुक्यात उर्वरित सिंचनासाठी देव नदीवर बॅरेजची उभारणी, रस्त्याचे रेंगाळलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत. धनेगाव बॅरेजला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे, अशा मागण्या पालकमंत्र्यांकडे केल्या.