निलंग्यात लवकरच ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST2021-05-10T04:19:35+5:302021-05-10T04:19:35+5:30

कोरोनामुळे रुग्ण वाढत असून, काही रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी अरविंद पाटील-निलंगेकर यांनी बैठक ...

Oxygen plant soon in Nilanga | निलंग्यात लवकरच ऑक्सिजन प्लांट

निलंग्यात लवकरच ऑक्सिजन प्लांट

कोरोनामुळे रुग्ण वाढत असून, काही रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी अरविंद पाटील-निलंगेकर यांनी बैठक घेतली. यावेळी श्री हनुमानजी खंडसरी साखर कारखान्याचे गट्टूशेठ अग्रवाल व त्यांचे चिरंजीव जगदीश अग्रवाल यांनी स्वतः पुढाकार घेऊन दिवसाला सुमारे १२० सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती सुरू करून निलंगा व परिसरातील सर्व कोविड सेंटरला देण्यासंदर्भात सहमती दर्शविली. लवकरात लवकर हा प्रकल्प उभारला जाईल याबाबत आवश्यक असलेली प्रशासकीय स्तरावरील सर्व मदत आणि सहकार्य करण्याचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी हमी दिली आहे.

बैठकीस तहसीलदार गणेश जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष मनोज कोळ्ळे, संतोष अट्टल, बांधकाम सभापती महादेव फट्टे, आदींची उपस्थिती होती. हा ऑक्सिजन प्लांट ४० दिवसांत उभा करणार असल्याचे जगदीश अग्रवाल यांनी सांगितले.

Web Title: Oxygen plant soon in Nilanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.