उदगीरात लवकरच ऑक्सिजन लिक्विड टँक कार्यान्वित होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:09+5:302021-04-19T04:18:09+5:30
उदगीर आणि जळकोट तालुक्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांबाबत बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय ...

उदगीरात लवकरच ऑक्सिजन लिक्विड टँक कार्यान्वित होईल
उदगीर आणि जळकोट तालुक्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांबाबत बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास, पालिकेचे मुख्यधिकारी राठोड, बस्वराज पाटील नागराळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, प. सं. उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सिजनयुक्त खाटा वाढविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध व्हावा, अशी शासनाकडे मागणी केली आहे. औषध आणि ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागणी केली असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. सर्व कोविड सेंटर्स आणि हॉस्पिटल्स येथे स्वच्छता आणि स्वच्छ पाण्याचे नियोजन असणे आवश्यक आहे.
कोविड केअर सेंटरची पाहणी...
राज्यमंत्री बनसोडे यांनी उदगीरातील आनंदनगर येथील अंध विद्यालय, जळकोट रोड येथील जयहिंद पब्लिक स्कूल, कौळखेड रोड येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. या कोविड सेंटरमधील विविध उपाययोजनांची माहिती घेतली. खाटा, ऑक्सिजन उपलब्धता आणि वैद्यकीय विशेषज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच रेमडेसिविरसारख्या आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्यासाठीही प्रशासनाला सूचना केल्या. कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला.