सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:14+5:302021-06-01T04:15:14+5:30
लातूर : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक डिसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता देण्यात यावा, अशी मागणी ...

सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता द्यावा
लातूर : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक डिसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांतील डिसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या थकीत वेतनाचा पहिला हप्ता रोखीने मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील ३० टक्के शिक्षकांना थकीत पहिला हप्ता मिळाला असून, ७० टक्के शिक्षकांना अद्यापही पहिला हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे डिसीपीएस धारक शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. थकीत हप्ता तत्काळ द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुरमे यांनी सांगितले.
निवेदनावर वनिता काळे, सुरेखा बस्तापुरे, तोलण देशमुख, सुनंदा बालवाड, वर्षा मुस्कावाड, मनोज भिसे, विश्वनाथ खंदाडे, दयानंद बानापुरे, पद्माकर आयनाले, अजित लांजीले, संतोष मारकोळे, सूर्यकांत कुलकर्णी, बालाजी बोरकर, युवराज माने, गणेश नराळे, तात्याराव मुंडे, गोविंद पडिले, धनंजय तोकले, गणेश मरेवाड, हणमंत केंद्रे, प्रभाकर तांबे, बुद्धगिर गिरी, बालाजी घुमे, महेश सूर्यवंशी, बालाजी भोळे, अतुल गुरमे आदींची नावे आहेत.