शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

फाजिल आत्मविश्वासाने माझा पराभव : शिवराज पाटील चाकूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:23 IST

सलग ३५ वर्ष राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपत कार्य केले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. 

चाकूर ( लातूर ) : नगरपालिकेपासून विविध अकरा निवडणुका मी जिंकल्या. मात्र २००४ ची लोकसभा निवडणूक अगदी सोपी आहे असा फाजिल आत्मविश्वास कार्यकर्त्यानी दाखविला. यामुळे माझा पराभव झाला असा उलगडा माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आज येथे केला. 

रोटरी क्लबच्यावतीने चाकूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा स्वागत समारंभ कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयात घेण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा जेष्ठ कॉंग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दरम्यान अॅड्. युवराज पाटील यांनी चाकूरकर यांना सलग ३५ वर्ष राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपत कार्य केले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असा प्रश्न विचारला. 

यावर उत्तर देतांना तब्बल १४ वर्षांनी चाकूरकर यांनी पराभवाच्या कारणाचा उलगडा केला. ते म्हणाले, नगरपालिकेपासून विविध अकरा निवडणुका मी जिंकल्या. मात्र लोकसभा निवडणूक अगदी सोपी आहे असा फाजिल आत्मविश्वास कार्यकर्त्यानी दाखविला. यामुळे माझा त्या निवडणुकीत अगदी नवख्या उमेदवारांकडून पराभव झाला. राजकारणात आलेल्या नव्या नेतृत्वाने गाफील राहू नये असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

२००४ ला होते प्रधानमंत्री पदाचे दावेदार राजकीय कारकिर्दीत सातत्याने यश मिळत असतांना सन २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या नवख्या उमेदवार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकर यांचा पराभव केला होता. नगराध्यक्ष ते लोकसभा सभापती असा दांडगा अनुभव असलेले चाकूरकर या निवडणूकीत विजयी झाले असते तर ते पंतप्रधानपदाचे दावेदार ठरले असते असे अनेक राजकीय विश्लेषकांचे आजही मत आहे. 

चढा आलेख असणारी राजकीय कारकीर्द चाकूरसारख्या छोटय़ा गावात जन्मलेल्या शिवराज पाटलांनी आपले नाव देशपातळीवर केले. लातूरच्या नगराध्यक्षापासून केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने गाजली. दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करीत व लातूरच्या न्यायालयात वकिली व्यवसाय करून जीवन व्यतीत करण्याचा त्यांचा मानस होता. पण मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी लातूर नगरपालिकेची निवडणूक लढवली व जिंकली.  त्यानंतर विविध निवडणुका जिंकत राजकीय कारकिर्दीतील यशाने त्यांची संगत धरली. नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती या चढत्या क्रमानंतर खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री त्यानंतर लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.

टॅग्स :Shivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरlaturलातूरcongressकाँग्रेसPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा