बियाणांसाठी २७ हजार अर्जांतून ७ हजार शेतकऱ्यांचेच नशीब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:17+5:302021-06-04T04:16:17+5:30
बियाणांसाठी निवड झालेले अर्ज... सोयाबीन - ४,१२६ तूर - २,४९६ मूग - ५४० उडीद - ३११ अनुदानित बियाणासाठी आलेले ...

बियाणांसाठी २७ हजार अर्जांतून ७ हजार शेतकऱ्यांचेच नशीब !
बियाणांसाठी निवड झालेले अर्ज...
सोयाबीन - ४,१२६
तूर - २,४९६
मूग - ५४०
उडीद - ३११
अनुदानित बियाणासाठी आलेले अर्ज - २७,३६१
निवड झालेल्या अर्जांची संख्या - ७,४७३
महागडे बियाणे कसे परवडणार...
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे मिळणार यासाठी अर्ज भरला होता. मात्र, सोडतीमध्ये लॉटरी लागली नाही. शेतकऱ्यांना विकतचे बियाणे अधिक दराने घ्यावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेत त्या सर्वांनाच सवलतीच्या दरात बियाणे द्यायला हवे. - अण्णासाहेब महामुनी, शेतकरी
खरीप हंगाम जवळ आला आहे. मशागतीची कामेही पूर्ण झाली आहेत. बाजारात बियाणांचा तुटवडा आहे. अनुदानित बियाणे मिळेल यासाठी अर्ज भरला होता. मात्र, त्यामध्ये निवड झालेली नाही. आता विकतच्या बियाणावर पेरणी करावी लागणार आहे. शासनाने निवड न केलेल्या शेतकऱ्यांचा विचार करायला हवा. - अप्पासाहेब कांबळे, शेतकरी
सोडत जाहीर झाली मात्र त्यात नावच नाही. निवड झाल्याचा संदेशही नाही. अर्ज भरले २७ हजार पैकी निवड केवळ ७ हजार ४७३ शेतकऱ्यांची झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी काय करायचे, हा प्रश्न आहे. शासनाने निवड न झालेल्या शेतकऱ्यांनाही सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे. - प्रल्हाद सूर्यवंशी, शेतकरी