दयानंद शिक्षण संस्थेत युवा संसदचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST2021-03-14T04:18:51+5:302021-03-14T04:18:51+5:30

केशवराज विद्यालयात वेध उज्ज्वल भविष्याचा उपक्रम लातूर : श्री केशवराज विद्यालयाच्या वतीने वेध उज्ज्वल भविष्याचा हा उपक्रम सुरु करण्यात ...

Organizing Youth Parliament at Dayanand Education Institute | दयानंद शिक्षण संस्थेत युवा संसदचे आयोजन

दयानंद शिक्षण संस्थेत युवा संसदचे आयोजन

केशवराज विद्यालयात वेध उज्ज्वल भविष्याचा उपक्रम

लातूर : श्री केशवराज विद्यालयाच्या वतीने वेध उज्ज्वल भविष्याचा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी धनंजय कुलकर्णी, नितीन शेटे, उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, शिवशंकर राऊत, क्षमा कुलकर्णी, शैलेश सुपलकर, कांचन तोडकर यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याची वाटचाल यशस्वीतेच्या दिशेने करता यावी म्हणून वेध उज्जवल भविष्याचा या उपक्रमाची सुरूवात केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आहे त्या कौशल्याचा शोध घेऊन ते कौशल्य विकसित करण्याचे काम या उपक्रमाव्दारे होणार असल्याचे नितीन शेटे म्हणाले.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उद्योगी बनावे

लातूर : महिलांनीही शिक्षण घेऊन बचत गटाच्या माध्यमातून उद्योगी बनावे, असे प्रतिपादन प्रीतमताई जाधव यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव भास्कर वैरागे, केशवराव भोसले, प्रकाश लेणेकर, बाळासाहेब जाधव, विवेक सौताडेकर, अहिल्या कसपटे, ताई बोराडे, पृथ्वीराज पवार, मीराताई देशमुख, बबिता साळुंके, समाधानताई माने, ब्रिजलाल कदम, सुनील माने, कृष्णा चौधरी आदींची उपस्थिती होती.

रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करावेत

लातूर : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेबाबत भाजीपाला पिकाची दर्जेदार व कीड-रोगमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. योजना प्रकल्प स्वरूपात असल्याने चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक राहील. लातूर, रेणापूर व शिरूर अनंतपाळ या तालुक्याचा लक्षांक शिल्लक असल्यामुळे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे १६ मार्चपर्यत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.एस. गवसाने यांनी केले आहे.

महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने फराळाचे वाटप

लातूर : येथील महाकाल प्रतिष्ठान व भक्त मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त शहरातील प्रत्येक मंदिरात कार्यरत असलेल्या सुरक्षा

व पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव डोंगरे, मनोज डोंगरे, प्रवीण शिवणगीकर, आदित्य इंगळे, श्रीकांत हाळे, पवन इंगळे, रोहित काळे, पीयूष शहा, रोहित डोंगरे, केदार घोलप, प्रशांत हिंगे, लखन इंगळे, शिवम राऊत, गंगाधर इंगळे, शुभम कोरे, प्रदीप काळे, ओम वाडकर, विशाल कदम, ओमकार फिसके, अभिषेक गडदे आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.

दयानंद कला महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम

लातूर : दयानंद कला महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, डॉ सुनीता सांगोले, डॉ मच्छिंद्र खंडागळे, डॉ.नितीन डोके, प्रा.संजय कुलकर्णी, डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ गोपाल बाहेती, नवनाथ भालेराव, रामकिसन शिंदे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

जिजामाता विद्या संकुलात जागतिक महिला दिन

लातूर : एमआयडीसी परिसरात असलेल्या जिजामाता विद्या संकुलात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व कर्तृत्ववान महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास एम.एल. पवार, एल.एल.श्रीमंगले, प्राचार्या सलीमा सय्यद, मुख्याध्यापिका साविजेता खंदारे, भाग्यशाली गुडे, वैशाली फुले, वैशाली वाघमारे, वर्षा येलमटे, सविता राठोड, प्रा.बाबासाहेब सोनवणे, राजकुमार शिंदे, बाळासाहेब बावणे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

राजर्षी शाहू महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा

लातूर : येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रशांत जोशी, मंजूषा शिंदे, प्रा. धनश्री जगताप, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, प्रशांत लामतूरे, प्रा. युवराज शिखरे, प्रा. श्रीनिवास मोरे, प्रा. दत्ता नल्लेत, प्रा. सी.व्ही. कुलकर्णी, प्रा. द.बा. सोनकांबळे यांनी यश मिळविले. स्पर्धेचे उद्घाटन ॲड. वैशाली लोंढे यांच्या हस्तेे करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, डॉ. कल्याण सावंत, डॉ. संभाजी पाटील, प्रा. विजय गवळी, प्रा. सोमदेव शिंदे

आदींसह रासेयोच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Organizing Youth Parliament at Dayanand Education Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.