‘सिलाई सोशल विक’ या सामाजिक उपक्रमांचे आयोजन व सिलाई जिद्द पुरस्काराचे वितरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:39+5:302021-02-05T06:23:39+5:30

लायन्स क्लब पुणे सारसबाग डायलिसिस सेंटर, महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान यांना आर्थिक मदत, तसेच सेवाधाम वृद्धाश्रम सिंहगड येथील वृद्धाश्रमात ...

Organizing social activities like 'Sewing Social Week' and distribution of Sewing Perseverance Award! | ‘सिलाई सोशल विक’ या सामाजिक उपक्रमांचे आयोजन व सिलाई जिद्द पुरस्काराचे वितरण !

‘सिलाई सोशल विक’ या सामाजिक उपक्रमांचे आयोजन व सिलाई जिद्द पुरस्काराचे वितरण !

लायन्स क्लब पुणे सारसबाग डायलिसिस सेंटर, महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान यांना आर्थिक मदत, तसेच सेवाधाम वृद्धाश्रम सिंहगड येथील वृद्धाश्रमात त्यांच्यासाठी संगीताचा कार्यक्रम, तसेच त्यांच्या बरोबर सहभोजन, त्यांना आर्थिक साहाय्य आणि त्यांच्यासाठी उबदार ब्लँकेटची भेट देण्यात आली.

बारामतीमधील ओंकार वृद्धाश्रमात अशाच प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. पुण्यातील ममता फाउंडेशनमधील एचआयव्हीबाधित मुलांसाठी त्यांच्या आवडीचे कपडे व आवडीचे पदार्थ देऊन, त्यांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न केला.

दादा गुजर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अनेक अडचणींशी सामना करून आज ‘सिलाई वर्ल्ड’ हे सर्व कुटुंबासाठी असलेलं वस्त्रदालन पूर्ण महाराष्ट्रात जिद्दीने उभे केले. अशीच जिद्द समाजामध्ये निर्माण करण्यासाठी ‘सिलाई जिद्द पुरस्काराचे’ आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि. २२ जानेवारी २०२१ रोजी अरण्येश्वर येथील सुपर्ण हॉलमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे हे होते. पुण्यातील तीन व नांदेडमधील दोन महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांना शिवण यंत्रे देण्यात आली. त्यांची जिद्द पूर्ण करण्यास या पुरस्काराचा नक्कीच उपयोग होईल, अशा भावना दादा गुजर यांनी व्यक्त केल्या. सिलाई वर्ल्ड केवळ व्यवसायच करीत नाही त्याचबरोबर समाजाशी आपले धागे, नाते जोडले आहे, समाजातील दुर्बल घटकांबद्दल सामाजिक बांधिलकी आहे. याच भावनेतून ‘सिलाई सोशल वीक’चे आयोजन करण्यात आल्याचे सिलाईचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले.

Web Title: Organizing social activities like 'Sewing Social Week' and distribution of Sewing Perseverance Award!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.