लातुरात बचत गटांच्या महाेत्सवाचे आयाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:56+5:302021-02-05T06:24:56+5:30
लातूर : येथील द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदालनाचे संचालक तुकाराम पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प मित्रमंडळाने केला आहे. ...

लातुरात बचत गटांच्या महाेत्सवाचे आयाेजन
लातूर : येथील द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदालनाचे संचालक तुकाराम पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प मित्रमंडळाने केला आहे. यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्यासाठी या गटांच्या महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. यातून या महिलांना मदतीचा हात दिला जाणार आहे. तुकाराम पाटील यांच्या कार्याला सामाजिक बांधिलकीची जाेड आहे. त्यांचा वाढदिवस यंदा अनाेख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प मित्रमंडळाकडून करण्यात आला आहे. दिनांक १ व २ फेब्रुवारी राेजी अंबाजाेगाई रस्त्यावरील द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदालनाशेजारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे स्टाॅल लावण्यात येणार आहेत. त्यात महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या स्नेहींनी या बचत गटांकडून त्यांना हवी असलेली वस्तू खरेदी करावयाची आहे. हीच या वाढदिवसाची भेट, शुभेच्छा ठरणार आहे. याशिवाय, १ फेब्रुवारी सकाळी रक्तदान शिबिर हाेणार आहे. दिनांक २ फेब्रुवारी राेजी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयाेजन केले आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांनी द्वारकादास श्यामकुमारच्यावतीने ठेवलेले वाण लुटावे. बचत गटांच्या स्टाॅलवर असलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन तुकाराम पाटील मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.
- वाणिज्य प्रतिनिधी