कव्हा येथे कार्यक्रमाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST2021-02-18T04:34:51+5:302021-02-18T04:34:51+5:30
राजमाता जिजामाता शैक्षणिक संकूलात व्याख्यान लातूर : येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात ‘नवीन शैक्षणिक धोरण व दहावी नंतर पुढे ...

कव्हा येथे कार्यक्रमाचे आयोजन
राजमाता जिजामाता शैक्षणिक संकूलात व्याख्यान
लातूर : येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात ‘नवीन शैक्षणिक धोरण व दहावी नंतर पुढे काय?' या विषयांवर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. बी. वाघमारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डी.एन. केंद्रे, रमेश बिराजदार, अशोक पवार, आर.डी. बिराजदार, ए.पी. पवार, संजय मुरमे, सचिन देशपांडे, प्रा.मारुती पवार, प्रा. के.डी. मुंडे, सुनीता जवळे आदींसह शिक्षक, कर्मच-यांची उपस्थिती होती.
शंकरपूरम येथे रस्ता व नालीचे काम
लातूर - शहरातील प्रभाग क्र. १८ मधील शंकरपूरम नगर भागातील रस्ता व नालीच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, बालाजी शेळके, भाग्यश्रीताई शेळके, सरिताताई राजगिरे, अमरदिप जाधव, कमलाकर कदम, आक्रम शेख, मुकदम फेरोज शेख, अर्जुन गायकवाड, विनोद साबदे, सुपरवाझर संदिप कांबळे, बबलु शिंदे, अक्षय ढावारे, बबलु गवडे, शरणप्पा अंबुलगे, गंगाधर मोरे, भाग्यश्रीताई बंडे, उषाताई मुदगडे, सोमनाथ सोमवंशी, सूर्यकांत सूर्यवंशी, संतोष पोद्दार, नाना जाधव, भागवत झरकर, नागनाथ विभूते, आत्माराम पवार आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने उपक्रम
लातूर - शहरातील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने शहीद जवानांच्या स्मरणार्थ ४० झाडे लावून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, डॉ. एकनाथ माले, आवेज काझी, विशाल राठी, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, गंगाधर पवार, कल्पना फरकांडे, ॲड. वैशाली यादव-लोंढे, बाळासाहेब बावणे, बळीराम दगडे, ऋषीकेश दरेकर, शिवशंकर सुफलकर, सिताराम कंजे, महेश गेल्डा, जफर शेख, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित, श्रुती लोंढे, सुरज पाटील, महेश भोकरे, विजयकुमार कठारे आदींसह टीमच्या सदस्यांची उपस्थिती होती.
दयानंद महाविद्यालयात जयंती साजरी
लातूर - येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नितेश स्वामी, मूल्यशिक्षण विभाग प्रमुख डॉ. मनीषा आष्टेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. गणेश लहाने, ग्रंथपाल प्रा.विठ्ठल जाधव आदींसह प्राध्यापक, कर्मचा-यांची उपस्थिती होती.