लातुरात रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:51+5:302021-04-29T04:14:51+5:30

बांधकाम कामगारांना दहा हजारांचे अनुदान द्या लातूर : बांधकाम कामगारांना १५०० रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही ...

Organizing blood donation camp in Latur | लातुरात रक्तदान शिबिराचे आयोजन

लातुरात रक्तदान शिबिराचे आयोजन

बांधकाम कामगारांना दहा हजारांचे अनुदान द्या

लातूर : बांधकाम कामगारांना १५०० रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही मदत तुटपुंजी असून, राज्य शासनाने सरसकट दहा हजार रुपये मदत करावी, अशी मागणी वडार समाज संघाचे राज्याध्यक्ष प्रा. श्रीकांत मुद्दे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बांधकाम मंडळाकडे कोट्यवधींचा निधी असून, कामगारांसाठी योजना राबविल्या जातात. १५०० रुपये देण्याच्या निर्णयामुळे गोरगरीब कामगारांवर अन्याय होत असून, अनेकांच्या हाताला कोरोनामुळे काम उपलब्ध झालेले नाही. दहा हजारांची मदत करावी, अशी मागणी केली आहे.

बियाणे, खते नियंत्रणासाठी भरारी पथके

लातूर : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खतांच्या नियंत्रणासाठी तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगाम काळात बियाणे तसेच खताच्या किमती वाढविल्या जातात. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथके नियुक्त केली असून, शेतकऱ्यांना या पथकाकडे तक्रारी करता येणार आहेत, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोनामुळे क्रीडा शिबिरे यंदाही बंद

लातूर : दरवर्षी उन्हाळी परीक्षेनंतर जलतरण, बॅडमिंटन, शुद्धलेखन, नृत्य, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, आदी बाबींवर उन्हाळी शिबिरे घेतली जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे संचारबंदी पुकारण्यात आल्याने उन्हाळी क्रीडा शिबिरे यंदाही बंद आहेत. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी घरी कंटाळले असून, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संचारबंदीमुळे क्रीडा संकुलेही बंद आहेत. याच संकुलावर क्रिकेट तसेच इतर खेळांचे प्रशिक्षण वर्ग होत असतात. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंदा प्रशिक्षण शिबिरेही बंद असल्याचे चित्र आहे.

Web Title: Organizing blood donation camp in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.