परराज्यातून रेमडेसिविर, अन्य औषधी मागवा, निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST2021-04-27T04:20:28+5:302021-04-27T04:20:28+5:30

शहर व तालुक्यातील कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा व उपाययोजनांबाबत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत ...

Order remedicivir, other medicines from foreign countries, funds will not be reduced | परराज्यातून रेमडेसिविर, अन्य औषधी मागवा, निधी कमी पडू देणार नाही

परराज्यातून रेमडेसिविर, अन्य औषधी मागवा, निधी कमी पडू देणार नाही

शहर व तालुक्यातील कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा व उपाययोजनांबाबत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, प्रा. श्याम डावळे, काँग्रेसचे मंजूरखाँ पठाण यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना बरे होण्यास प्रोत्साहन द्यावे. रुग्णांसोबतच्या नातेवाइकांना राहण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेऊन उपाययोजना करावी. उदगीर शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणेस निर्देश दिले. दरम्यान, शासकीय रुग्णालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकची पाहणीही राज्यमंत्री बनसोडे यांनी करून जलद गतीने काम करण्याच्या सूचना केल्या.

Web Title: Order remedicivir, other medicines from foreign countries, funds will not be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.