महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महिलांच्या हक्काच्या व्यासपीठाशी जुडण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:01+5:302021-03-06T04:19:01+5:30

लातूर : महाराष्ट्रातील सर्वात मोठे महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या लोकमत सखी मंचच्या वतीने खास महिलांसाठी वर्षभर विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक ...

Opportunity to join the largest women's rights platform in Maharashtra | महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महिलांच्या हक्काच्या व्यासपीठाशी जुडण्याची संधी

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महिलांच्या हक्काच्या व्यासपीठाशी जुडण्याची संधी

लातूर : महाराष्ट्रातील सर्वात मोठे महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या लोकमत सखी मंचच्या वतीने खास महिलांसाठी वर्षभर विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या निखळ मनोरंजनासाठी, एकंदरीत प्रत्येक महिलेला स्वतःसाठी वेळ देऊन मनमुराद जगण्याचा आनंद देण्यासाठी लोकमत सखी मंचने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात महिला सदस्य नोंदणी करतात व वर्षभर विविध कार्यक्रमांचा आनंद घेतात.

गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता वर्ष २०२० मध्ये सदस्य नोंदणी केलेल्या सखी सदस्यांना लोकमतच्या वतीने एक अनोखी भेट देण्यात आली आहे,ती म्हणजे त्याच जुन्या (२०२०) ओळखपत्रावर वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या सखी मंचच्या सर्व कार्यक्रमांना मोफत प्रवेश देण्यात येणार असून जुन्या सदस्यांना सदस्य नूतनीकरण करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे सर्व सखी सदस्यांसाठी ही वर्षभरासाठी आनंदाची पर्वणी असणार आहे. परंतु, याचबरोबर अशा अनेक महिला आहेत ज्यांना काही कारणास्तव २०२० या वर्षात सदस्य नोंदणी करता आली नाही, खास अशा महिलांसाठी लोकमतच्या वतीने पुन्हा सखी मंच सदस्य होण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

दरम्यान, दि. १ मार्च ते १० मार्च २०२१ या कालावधीदरम्यान शहरातील अधिकृत सखी मंच विभाग प्रतिनिधींकडे व लोकमत भवन, बी-३६ एमआयडीसी लातूर या ठिकाणी सदस्य नोंदणी उपलब्ध असणार आहे. सदस्य नोंदणीसाठी रु. ५००/- सदस्यत्व शुल्क असून या ५०० रुपयांत सखींना रु. ७५० किमतीचे मारबोलो या कंपनीचे बाथरूम सेट ( ४ पीस ) व सोबत सखीमंचचे आकर्षक ओळखपत्र मिळणार आहे. यासोबतच २०२१ मध्ये येणाऱ्या विविध स्पर्धा व कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. तरी शहरातील महिलांनी लवकरात लवकर सखी मंच सदस्य होऊन या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.

येथे सदस्य नोंदणी उपलब्ध

सदस्य नोंदणीसाठी महिलांनी शहरातील लोकमत सखी मंचच्या अधिकृत विभाग प्रतिनिधींकडे किंवा लोकमत भवन, बी-३६ एमआयडीसी लातूर ०२३८२-२२४३५३ या ठिकाणी सदस्य नोंदणी करावी. १ ते १० मार्च २०२१ या कालावधीदरम्यानच सदस्य नोंदणी उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी मंदाकिनी शेटकार - ९७३०१७५९७९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

सुनीता नाडे, तुलसीधाम अपार्टमेंट कोकाटे नगर मो. ९४२०८१६७०४, विद्याराणी भालेराव, विक्रम नगर मो. ८६६८२३२४०७, सुलेखा कारेपूरकर, आस्था हाॅस्पिटल आंबेडकर चौक, मो. ९९२१३६७२८८, स्वाती काळे, कालिकादेवी मंदिराच्या पाठीमागे राघवेंद्र काॅलनी मो. ८६६८६५५४७४, हेमा येळे, मदने नगर अंबाजोगाई रोड मो. ९०११११७१८४, अंजली फासे, साईप्रेम अपार्टमेंट विशाल नगर मो. ९४०३४५६७२२, माधुरी कांबळे, महसूल काॅलनी जुना औसा रोड मो. ८६०५३९५२११ , वंदना समुद्रे, श्रीरंग अपार्टमेंट सिग्नल कॅम्प मो. ९४२२९५१४७७, वनमाला सिकची, लक्ष्मी काॅलनी मो. ९९७५५६१११०, वनिता कांबळे, विकास नगर मो. ९६०४५२८४८६, पल्लवी कुलकर्णी, सिग्नल कॅम्प मो. ९६०७७६७९६०, माया कांबळे, बस्तापुरे नगर, लेबर काॅलनी मो. ७३८५०६५५६८, राजश्री गायकवाड, न्यू रेणापूर नाका मो. ७९७२०६९४४७, माया विद्यासेवक, एलआयसी काॅलनी, स्वप्नपूर्ती अपार्टमेंट मो. ९८९०६०८०४५, अश्विनी सुवर्णकार, एलआयसी काॅलनी मो. ९४२३५४३५०४, सुनंदा कोरे, श्रीनगर मो. ९८५०७५२३९५, ज्योती बिराजदार, केशव नगर मो. ९४२२०२४२३२, अर्चना दाडगे, विक्रम नगर मो. ८५५४९८२१८१, प्रीती मिसाळ, न्यूमी ब्युटी पार्लर कोकाटे नगर मो. ९५६१७५०९७१, संगीता चोपडा, राजनंदिनी सारीज, कव्हा रोड मो. ९१५८७९४०००येथे सदस्य नोंदणी उपलब्ध.

सदस्य नोंदणीसाठी महिलांनी शहरातील लोकमत सखी मंचच्या अधिकृत विभाग प्रतिनिधींकडे किंवा लोकमत भवन, बी-३६ एमआयडीसी लातूर ०२३८२-२२४३५३ या ठिकाणी सदस्य नोंदणी करावी. १ ते १० मार्च २०२१ या कालावधी दरम्यानच सदस्य नोंदणी उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी मंदाकिनी शेटकार - ९७३०१७५९७९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Web Title: Opportunity to join the largest women's rights platform in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.