रबी हंगामात केवळ ८ टक्के कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:35+5:302020-12-05T04:31:35+5:30
कागदपत्रांची कारणे देत टाळाटाळ... खरीप हंगामाच्या शेवटी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे रबी हंगामात ...

रबी हंगामात केवळ ८ टक्के कर्ज वाटप
कागदपत्रांची कारणे देत टाळाटाळ...
खरीप हंगामाच्या शेवटी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे रबी हंगामात पेरणी केल्यानंतर चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यानुसार कृषी विभागाच्या वतीने क्षेत्राचे नियोजनही करण्यात आले आहे. पेरणीही अंतिम टप्प्यात आहे. मात्र आर्थिक अडचण असल्याने शेतकरी बँकांकडे चकरा मारत आहे. मात्र कागदपत्रांची कारणे देत शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जिल्ह्यात रबी कर्जासाठी हजारो सभासद...
रबी हंगामात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांकडे जवळपास हजारो शेतकऱ्यांची नोंदणी आहे. अनेक जणांना कर्जमुक्ती योजनेच लाभ मिळाला आहे. त्यामुळे सदरील शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळेल, अशी अपेक्षा आहे.