ग्रामीण भागातील शिक्षणाला ऑनलाइनचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:40+5:302020-12-31T04:20:40+5:30
/ वाढवणा बु. : गत दहा महिन्यापासून कोरोनामुळे शांळा बंद आहेत. सध्या महाराष्ट्रात ९ ते १२ वी पर्यंतचे ...

ग्रामीण भागातील शिक्षणाला ऑनलाइनचा आधार
/ वाढवणा बु. : गत दहा महिन्यापासून कोरोनामुळे शांळा बंद आहेत. सध्या महाराष्ट्रात ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थी संख्या हळूहळू वाढत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग कोरोना प्रतिबंधक उपायाचे मार्गदर्शन करत आहे. शालेय स्तरावर मास्क अनिवार्य आहे. सँनिटायजर वापर करणे, वैयक्तिक स्वच्छता पाळणे, एकमेकात अंतर ठेवणे आदी सुचना केल्या जात आहेत.
सध्या नववीपासुन बारावीपर्यंतचे वर्ग सुरु आहेत, मात्रं ज्या वयात मुलावर संस्कार रुजवले जातात. अशा वयात म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. परिणामी, पालकाची चिंता वाढली आहे. उदगीर तालुक्यात कोरोना संसर्ग वाढला होता. मात्र सध्या ताे प्रभाव कमी झाला आहे. शाळेत भाषण, खेळ, विविध स्पर्धांच्या माध्यमताून मुलाचा शारीरिक, बौद्धिक विकास केला जाताे. मात्र कोरोनामुळे प्राथमिक शाळा सध्या बंदच आहेत. त्या सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक करत आहेत. ग्रामीण भागात सुरु असलेल्या आँनलाईन शिक्षणात नेटवर्किंगचा अडथळा आहे.
शाळा सुरू नसल्याने सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत मुलं टिव्ही, मोबाईल, नाहीतर बाहेर खेळण्यासाठी पडत आहेत. त्यामुळे वेळेवर जेवण करत नाहीत, ना अभ्यास करत नाहीत, असे वाढवणा येथील पालक हिरष बिडवई म्हणाले.
ऑनलाइन शिक्षणातून धडे...
शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही, मुलांना मोबाईलच्या माध्यमातून शैक्षणिक काम सुरुच आहे. स्वाध्याय, फोनवरुन चौकशी, गृहभेटी या माध्यमातून शैक्षणिक आढावा घेतला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून कोविड कॅप्टन नेमण्यात आले आहेत. या मध्यमातून शैक्षणिक काम चालूच आहे. पालक-शिक्षक समन्वयातून शिक्षण चालूच आहे.
- ज्ञानेश्वर नकुरे, मुख्याध्यापक, आडोळवाडी