जिल्ह्यात एकूण २ हजार ६९० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या आहे. त्यापैकी १ ली ते ८वी चे वर्ग बंद आहेत. कोरोना नियमांचे पालन करीत नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये २३४ पैकी २२४ शाळांमध्ये ५८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. नवीन वर्षांत या उपस्थितीमध्ये वाढ करण्याचे उद्दीष्ट शिक्षण विभागासमोर आहे. आयटीआय, तंत्रनिकेतन, अकरावी, बारावीच्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. त्यामूळे नवीन वर्षांतच अभ्यासक्रमाला सुरुवात होईल. सरत्या वर्षात ऑनलाईनमूळे नवीन वर्षांत शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या संकाटामुळे ऑनलाईन शिक्षण राबविण्यात आले असले तरी दहावी, बारावीसह सर्वच अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळेवर घेण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
मॉडेल शाळांच्या विकासावर भर...
जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या मार्गदर्शनानूसार नवीन वर्षात बाला उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक तालूक्यात दोन याप्रमाणे जिल्ह्यातील २० शाळांची मॉडेल स्कूलसाठी निवड करण्यात आली आहे. त्यानूसार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी नवोपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी यांनी व्यक्त केला.
गुणवत्तेची परंपरा कायम ठेवणार...
माध्यमिक शाळांत ऑफलाईन वर्ग सुरु झाले आहेत. ५८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असून, दहावी, बारावी परीक्षेच्या निकालात लातूरचा दबदबा असतेा. यंदा कोरोनाच्या संकटामूळे ऑनलाईन अभ्यास असला तरी गुणवत्ता कायम आहे. त्यामुळे नवीन वर्षांत उज्वल गुणवत्ता आणि यशाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डी.ए. मोरे यांनी सांगितले.