सरत्या वर्षांत ऑनलाईन शिक्षणाला मिळाली चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:18+5:302020-12-31T04:20:18+5:30
मार्च महिना हा खरातर परीक्षांचा काळ. मात्र, कोरोनाच्या संंकटामुळे मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले़ त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात ...

सरत्या वर्षांत ऑनलाईन शिक्षणाला मिळाली चालना
मार्च महिना हा खरातर परीक्षांचा काळ. मात्र, कोरोनाच्या संंकटामुळे मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले़ त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली़ पहिली ते पदवीपर्यंतच्या परीक्षांवर अनिश्तितेचे सावट पसरले़ अभ्यासाला गती देण्यासाठी ७ एप्रिलपासून ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यात आला़ दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका वेळेवर मिळाल्या नसल्याने निकालास विलंब लागला़ त्यातच पदवीच्या परीक्षांवरुन मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र होते़ नीट, जेईई, सीईटी परीक्षांवरही शाळा बंदचा परिणाम दिसून आला़ आता नियमांचे पालन करीत नववी ते बारावीचे वर्ग सुरु आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाचा मसूदा, वैद्यकीय प्रवेशाचे ७०:३० चे प्रादेशिक आरक्षण, नीट परीक्षा, दहावी, बारावीचा निकाल यासह अनेक घडामोडीमुळे २०२० हे वर्ष सर्वांच्याच स्मरणात राहणारे आहे़ कोरोनाने सरत्या वर्षांत केलेले सर्वच क्षेत्रातील नुकसान दिर्घकाळ परिणाम करणारे आहे़ त्यामुळे नव्या वर्षांत अधिक जोमाने यावर मार्ग काढत नवीन आव्हाने पेलण्याची ताकद अंगी निर्माण करावी लागणार आहे़
लातूरने दिला राज्याला ऑनलाईनचा पॅटर्न...
कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद असताना लातूरातील सर्वच शाळा, महाविद्यालयांनी आॅनलाईनची प्रभावी अंमलबजावणी केली़ त्यामुळे लातूर ऑनलाईन पॅटर्नची राज्यभर चर्चा होती़ ऑफलाईनकडून अॉनलाईनकडे जाताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला़ मात्र, त्यावर मात करीत यशाची शिखरे विद्यार्थ्यांनी पादक्रांत केली़ दहावी, बारावी, नीट, जेईई, सीईटी या परीक्षेत लातूरचा दबदबा राज्यात कायम राहिला़
७०:३० प्रादेशिक आरक्षण रद्द...
वैद्यकीय प्रवेशासाठी राबविण्यात येणारे ७०:३० प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतला़ त्यामुळे मराठवाडा आणि विशेषत: लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़
विद्यापीठ पदवी परीक्षांचा गोंधळ...
राज्य सरकाराने पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला़ मात्र, राज्यपालांच्या निर्णयानुसार परीक्षा घेण्याच्या सुचना मिळाल्यानंतर विद्यापीठ पदवी परीक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते़