लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली
तासन्तास मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक स्क्रीन पुढे राहिल्याने लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढलेल्या असल्याच्या तक्रारी बालरोगतज्ज्ञांकडे येत आहेत.
तास संपल्यानंतर प्रत्येकवेळी दहा मिनिटे ब्रेक घेऊन डोळे झाकून घ्यावे.
मैदानी खेळ, झोप आणि सकस आहार मुलांना द्यावा. जेणेकरून त्रास वाढणार नाही.
पालकही चिंतेत
मुलांना डोळेदुखीचा त्रास, डोळ्यातून पाणी येणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी अशा तक्रारी आहेत. ऑनलाईन शिक्षण बंद करावे, अशी मानसिकता झाली आहे. तीन ते चार तास दररोज मोबाईलवर वर्ग करणे अवघड आहे. - संजय ढाले.
मुलांचा खेळ बंद आहे. त्यामुळे वर्ग केल्यानंतर मुलं पुन्हा मोबाईल घेऊनच गेम खेळत बसतात. तासन्तास मोबाईल हातात राहिल्यामुळे चिडचिडेपणा येत आहे. परंतु, सध्या पर्याय नाही. शाळा तर करावीच लागेल. म्हणून मोबाईल दिला जातो. - विनोद बनसोडे
जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक म्हणतात
कॉम्प्युटर व्हिजन सिड्रोम नावाचा आजार लहान मुलांसह मोठ्या मुलांमध्ये दिसून येत आहे. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळे दुखणे, डोके दुखणे अशा तक्रारी आहेत. त्यावर उपाय स्क्रीन वेळ कमी करणे, घरच्या घरी खेळणे, तासिका संपल्यानंतर किमान दहा मिनिटे डोळे मिटवून आराम करणे हे उपाय आहेत.
- डॉ. श्रीधर पाठक.