बांधकामावरुन एकाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST2021-03-04T04:36:09+5:302021-03-04T04:36:09+5:30

... तहसीलसमोरील दुचाकी पळविली लातूर : तहसील कार्यालयाच्या वाहनतळामध्ये उभी केलेली दुचाकी अज्ञाताने पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजी ...

One's head was blown off the building | बांधकामावरुन एकाचे डोके फोडले

बांधकामावरुन एकाचे डोके फोडले

...

तहसीलसमोरील दुचाकी पळविली

लातूर : तहसील कार्यालयाच्या वाहनतळामध्ये उभी केलेली दुचाकी अज्ञाताने पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिसोरी येथील सुरेश जाधव हा काही कामानिमित्ताने तहसील कार्यालय परिसरात आला होता. त्याने आपली दुचाकी एमएच २४, पी ७२६३ ही तहसील कार्यालयाच्या परिसरातील वाहनतळात उभी केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ती दुचाकी पळविली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीची किंमत २० हजार रुपये आहे.

...

सव्वादोन लाखाची हरभ-याची बनीम पेटविली

लातूर : अहमदपूर तालुक्यातील सलगरा येथील एका शेतक-याने शेतातील हरभ-याची काढणी करुन बनीम रचली होती. दरम्यान, दोघांनी ही बनीम पेटवून दिली. यात २ लाख १५ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलगरा येथील विठ्ठल मोरे यांनी शेतातील हरभ-याची काढणी करुन राशीसाठी बनीम रचली होती. दरम्यान, गावातील दोघांनी या बनीमीस पेटवून दिले. त्यात मोरे यांच्या ३५ क्विंटल हरभ-याचे नुकसान झाले. त्याची किंमत जवळपास २ लाख १५ हजार रुपये होऊ शकते. याप्रकरणी मोरे यांच्या फिर्यादीवरुन अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. केंद्रे हे आहे.

...

Web Title: One's head was blown off the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.