चाेरीतील दुचाकीसह एकाला केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:48+5:302021-09-23T04:22:48+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेटारसायकल चाेरीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात ...

चाेरीतील दुचाकीसह एकाला केली अटक
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेटारसायकल चाेरीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या घटनांतील आराेपींच्या शाेधासाठी पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पाेलीस पथकाला विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आराेपी हा औसा राेड परिसरात चाेरलेली माेटारसायकल विकण्याच्या प्रयत्नात फिरत असल्याची माहिती पाेलीस पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पवन अशाेक काळे (२४, रा. म्हाडा काॅलनी, महाराणा प्रतापनगर, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अधिक चाैकशी केली असता, त्याने विविध ठिकाणांहून माेटारसायकली चाेरल्याची कबुली दिली आहे. त्यातील एक माेटारसायकल घरासमाेर थांबविली आहे तर दुसरी माेटारसायकल माझ्या ताब्यात असल्याचे सांगितले. पाेलीस पथकाने दाेन माेटारसायकल आणि माेबाइल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या माेटारसायकलीची पडताळणी केली असता, त्या शिवाजीनगर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरण्यात आल्याचे पुढे आले आहे. याबबात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. आता पवन काळे याला शिवाजीनगर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार प्रमोद तरडे, योगेश गायकवाड, कर्मचारी भोंग यांच्या पथकाने केली आहे.