वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे झाडाचा गणपती, ट्री बँक, वृक्ष दत्तक योजना, वृक्ष बक्षीस योजना, एक मित्र: एक वृक्ष अभियान, एक विद्यार्थी: एक वृक्ष अभियान, प्लास्टिक मुक्त भारत, पर्यावरणपूरक सण-उत्सव, झाडांचा वाढदिवस, वृक्षांशी मैत्री अभियान, झाडांसोबत रक्षाबंधन, वृक्ष हेल्पलाईन आदी नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील सरस्वती काॅलनीतील श्री. शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाडे लावण्यात आली. यावेळी जिल्हाभर एक व्यक्ती एक वृक्ष उपक्रम राबवून सर्वांना यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक राजाराम खंदाडे, पर्यवेक्षक संगाप्पा बावगे, प्रा. ज्योत्स्ना पाटील, प्रा.राजेश कटके, सूर्यकांत इजारे, अशोक तोगरे, सर्वोत्तम कुलकर्णी, दैवशाला गायकवाड, आशा खंदारे, मनिषा पाटील, संगीता इजारे, बालाजी इरले, विठ्ठल खंदाडे, वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलिक, रामेश्वर बावळे, अमोल स्वामी, प्रशांत स्वामी, शिवाजी निरमनाळे, कृष्णा काळे, राहुल माशाळकर, अभिजित कोरनुळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वसुंधरा प्रतिष्ठानचा एक व्यक्ती एक वृक्ष उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST