शेतीच्या कारणावरून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:34+5:302021-05-05T04:32:34+5:30
दुचाकीसह मोबाईलची चोरी लातूर : चाकूर तालुक्यातील आलगरवाडी येथे एमएच २४ एएन ९७२१ या क्रमांकाच्या दुचाकीची तसेच एका मोबाईलची ...

शेतीच्या कारणावरून एकास मारहाण
दुचाकीसह मोबाईलची चोरी
लातूर : चाकूर तालुक्यातील आलगरवाडी येथे एमएच २४ एएन ९७२१ या क्रमांकाच्या दुचाकीची तसेच एका मोबाईलची चोरी झाल्याची घटना घडली. अलगरवाडी पाटी जवळील मंदिरासमोर दुचाकी लावली होती. अनोळखी अज्ञात २० ते २२ वर्षाच्या मुलाने त्याची चोरी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
उधारीचे पैसे मागण्यावरून मारहाण
लातूर : उधारीचे पैसे मागण्यावरून लाथाबुक्क्याने तसेच काचेची बॉटल डोक्यात मारून जखमी केल्याची घटना सारोळा रोड येथे घडली. याबाबत दीपक अशोक गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबा भरत माने (रा. संजयनगर, लातूर) याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कोकणे करीत आहेत.