इंडिया नगर येथे एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:23+5:302021-03-04T04:35:23+5:30
भाजी मार्केट येथून मोबाईलची चोरी लातूर : शहरातील पाण्याच्या टाकीसमोरील भाजी मार्केट येथे खरेदीसाठी गेले असता खिश्यातील मोबाईल अज्ञात ...

इंडिया नगर येथे एकास मारहाण
भाजी मार्केट येथून मोबाईलची चोरी
लातूर : शहरातील पाण्याच्या टाकीसमोरील भाजी मार्केट येथे खरेदीसाठी गेले असता खिश्यातील मोबाईल अज्ञात चोरट्यांनी खिश्यातून काढून घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी माधव मारोती दराडे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक घुले करीत आहेत. दरम्यान, लातूर शहरात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बीअरच्या बाटलीने डोक्यात मारून केले जखमी
लातूर : तुझी भावकी माझ्या शेताच्या कडेने वाट नसताना वाहने घेऊन का जातात म्हणून शिवीगाळ करीत हातातील बीअरच्या बाटलीने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना गोंदेगाव शिवारात २७ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी दिलीप प्रभाकर देशमुख यांच्या तक्रारीवरून राहुल बापू गायकवाड यांच्याविरुद्ध गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. जाधव करीत आहेत.
पैशाच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण
लातूर : पेट्रोल भरण्यासाठी फिर्यादी गेले असता संगनमत करून ऑनलाईन पेमेंटसाठी तेथील कर्मचाऱ्यांसोबत वादावादी झाली. तेथील मॅनेजरकडे गेले असता त्याने ऑनलाईन व्यवहार बंद आहे, तुम्ही नगदी पैसे द्या, असे म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी फिर्यादी धनंजय रामदास गडदे यांच्या तक्रारीवरून अजय लामतुरे व सोबत असलेल्या दोघाजणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एचएमएनसी दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेहरकर करीत आहेत.